Photo – क्रूरकर्मा किम सुकल्या केळ्यासारखा दिसायला लागला, भयंकर आजाराने ग्रस्त असल्याची चर्चा

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा क्रूरकर्मा किम जोंग उन त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जातो. त्याच्या क्रूरतेच्या अनेक कथांच्या जगभरात चर्चा होत असतात.

kim-jong

किम जोंग उनमुळे उत्तर कोरियातील लोकांचे जगने मुश्कील झाले आहे. तेथील लोकांवर किमने अनेक प्रकारचे भयंकर निर्बंध घातले आहेत.

kim-jong

मात्र उत्तर कोरियाचा हा हुकुमशहा सध्या आजारी असल्याचे बोलले जात आहे. किमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याचे वजन फारच घटल्याचे दिसून येत आहे.

kim-jong-un-of-north-korea

महिनाभरापूर्वी एका सरकारी प्रसारमाध्यमाने किम जोंग उनच्या तब्येतीविषय़ी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता हा नवीन फोटो व्हायरल झाल्यानंतर किम जोंग उन याची तब्येत खालावली असल्याचे बोलले जात आहे.

kim-jong-un

दरम्यान काही लोकांनी किम जोंग हा वजन कमी करत असल्याने असा दिसत असल्याचे म्हटले आहे. किमला वाढत्या वजनामुळे गेल्या वर्षी त्रास झाला होता. त्याने वजन कमी करायचे ठरवलेले. वजन कमी केल्यानंतरचा त्याचा तो फोटो असल्याचे बोलले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या