प्रसिद्ध रॅपर ‘कान्ये वेस्ट’चं डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान; लढवणार अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

971

प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट याने आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्देशियनचा पती कान्ये वेस्ट याने ट्विट करून ही घोषणा केली आहे. ही घोषणा करताना कान्येने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ‘आपण देवावर विश्वास ठेवून, आपली स्वप्नं एक करून आणि आपलं भविष्य साकारून अमेरिका घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची आता गरज आहे. मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे.’

कान्ये वेस्टने केलेल्या ट्विटला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी रीट्वीट केले आहे. तसेच 10 लाखांहून अधिक लोकांनी हे ट्विट लाईक केले आहे. असे असतानाच कान्ये आपल्या उमेदवारीबद्दल गंभीर आहेत की नाही. तसेच त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे की नाही, याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, 3 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत.

kim

आपली प्रतिक्रिया द्या