आयपीएलच्या लढाईत पंजाबची धुरा अश्विनच्या खांद्यावर

41

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलच्या ११ व्या पर्वासाठी पंजाबच्या नेतृत्वाची धुरा आर. अश्विनच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सोमवारी पंजाबकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. याआधी बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या लिलावामध्ये पंजाबने फिरकी गोलंदाज आर. अश्विनला ७ कोटी ६० लाखांना खरेदी केले होते. अश्विनसह पंजाबकडून लोकेश राहुल, अँड्रयू टाय, मार्कस स्टॉईनिस, करुण नायर, अक्षर पटेल, ख्रिस गील, अॅरोन फिंच आणि डेव्हिड मिलर हे प्रमुख खेळाडू खेळताना दिसतील.

आयपीएलमध्ये आधीच्या पर्वांमध्ये अश्विनने चेन्नई सुपर किंग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल जिंकणाऱ्या संघाचे अश्विनने दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रात पंजाबला चषक जिंकून देण्यासाठी अश्विन तयार आहे. अश्विनने हिंदुस्थानी संघाकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्याच्यावर संघाची धुरा सोपवण्यात कोणतीही अडचण आली नाही, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.

कर्णधारपदी निवड झाल्यानंतर अश्विनने या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. जीवनामध्ये नेहमी पुढे जाण्यास आणि प्रत्येक समस्यांवर विजय मिळवण्यास मी नेहमीच जास्त महत्त्व देतो असे अश्विन म्हणाला आहे. पंजाबचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ठ आणि सर्वांना गर्व वाटेल अशी कामगिरी करेल असा विश्वास अश्विनने व्यक्त केला आहे. तसेच कर्णधारपदाचा कोणताही दबाव नसेल असेही स्पष्ट केले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब संघ –
आर. अश्विन – ७ कोटी ६० लाख
अक्षर पटेल – १२ कोटी ५० लाख
डेव्हिड मिलर – ३ कोटी
मार्कस स्टॉईनिस – ६ कोटी २० लाख
युवराज सिंह – २ कोटी
मयांक अग्रवाल – १ कोटी
करुण नायर – ५ कोटी ६० लाख
लोकेश राहुल – ११ कोटी
अॅरोन फिंच – ६ कोटी २० लाख
मोहित शर्मा – २ कोटी ४० लाख
अंकित राजपूत – ३ कोटी
मुजीब जार्दन – ४ कोटी
मंजूर डार – २० लाख
प्रदीप साहू – २० लाख
मनोज तिवारी – १ कोटी
अँड्रयू टाय – ७ कोटी २० लाख
आकाशदीप नाथ – १ कोटी
ख्रिस गील – २ कोटी
बरिंदर सरन – २ कोटी २० लाख
बेन द्वारशियस – १ कोटी ४० लाख
मयंक डागर – २० लाख

आपली प्रतिक्रिया द्या