तृतियपंथियांबरोबरची मैत्री पडली महाग, कापला प्रायव्हेट पार्ट

36

सामना ऑनलाईन। शाहजहापूर

उत्तर प्रदेशमधील शाहजहापूर येथे तृतियपंथियांबरोबर मैत्री करणं एका वीस वर्षीय तरुणाला महागात पडलं आहे. तरुण लग्नसमारंभात जाऊन नाच करायचा. ते न आवडल्याने त्याच्या तृतियपंथीय मित्रांनी त्याला बेदम मारहाण करत त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित तरुण बेरोजगार होता व पोट भरण्यासाठी लग्न समारंभात जाऊन नाचायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर तो कुटुंबाची गुजराण करायचा. याचदरम्यान फरूखाबाद येथे त्याची ओळख काही तृतियपंथियांबरोबर झाली. ते ही लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात नाचत. त्यामुळे तृतियपंथियांनी त्याच्याबरोबर मैत्री केली. अनेक कार्यक्रमांना तो त्यांच्या सोबतही जायचा. त्यांच्याबरोबर नाचायचा. हे पाहून लोक खुश व्हायचे व त्याला जास्त पैसे द्यायचे. हे काही तृतियपंथीयांना पटले नाही.

हाच राग मनात ठेऊन काही दिवसांपूर्वी ते अचानक त्याच्या घरी गेले व त्याला गाडीत टाकून फरूखाबाद येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी त्याला बेदम मारहाण केली व त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. दहा दिवस त्यांनी त्याला एका खोलीत डांबून ठेवले. एक दिवस योग्य संधी बघून तरुणाने तिथून पळ काढला. त्यानंतर तो कसाबसा रुग्णालयात पोहचला. दरम्यान याप्रकरणी तरुणाने तृतियपंथियाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या