हिमाचलमधील किन्नर कैलास यात्रा स्थगित, पावसाचा फटका, अनेक भागांत मुसळधार पाऊस

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्हा प्रशासनाकडून खराब हवामानामुळे किन्नर कैलास यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आता हवामान अनुकूल झाल्यानंतर आणि रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. सध्या ही यात्रा असुरक्षित घोषित करण्यात आली आहे. किन्नर कैलासची यात्रा दोन दिवसांपूर्वी सुरू झाली होती, परंतु प्रशासनाला ही यात्रा स्थगित करावी लागली आहे. 21 ते 23 जून या काळात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच-सहा दिवस यात्रा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. भगवान भोलेनाथाचे भक्त किन्नर कैलास यात्रेसाठी देशभरातून येतात.

किन्नर कैलास हे 19,850 फूट उंचीवर असलेले मंदिर आहे. काल रात्रीपासून सकाळी 9 वाजेपर्यंत हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. शिमला येथेही 5 तासांपेक्षा जास्त काळ पाऊस पडला. या वर्षी 23 जणांचा भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे मृत्यू झाला आहे, तर 35 जण बेपत्ता आहेत. या पावसाळ्यात 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सरकारी आणि खासगी मालमत्ता नष्ट झाली आहे.