किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची लूक आऊट नोटीस

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात कारवाईत सहभागी असणाऱया किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. गोसावी याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याच गुह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

गोसावी याने फेसबुकद्वारे एका तरुणाला मलेशियात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी मे 2018 रोजी त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यानंतर तो फरारी झाला होता. दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर मागील आठवडय़ात क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने छापा कारवाई केली. या कारवाईत किरण गोसावी आर्यन याच्यासोबत दिसला होता. तो पह्टो सोशल मीडियात मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला होता. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी याच्यावर आरोप केले होते. त्यामुळे कारवाईवरच संशय निर्माण झाला होता. तेव्हापासून किरण गोसावी चर्चेत आला होता. या दरम्यान आता पुणे पोलिसांनी गोसावीवर मोठी कारवाई करत त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या