किरीट सोमय्या यांचे भाजपमध्ये पुनर्वसन

2493

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉ. सुभाष भामरे व प्रवीण पोटे-पाटील, योगेश गोगावले व अशोक कांडलकर यांचीही प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे. पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे तर पुणे शहर सरचिटणीसपदी गणेश बीडकर, जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्षपदावर नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहमुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये

भाजप प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरीष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या