Farmers protest – 1 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा संसदेवर पायी मोर्चा

कृषी कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी घोषणा केली आहे की, आंदोलक शेतकरी 1 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवरून संसदेच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते दर्शन पाल म्हणाले, ‘ट्रॅक्टर रॅलीनंतर हा आमचा पुढचा कार्यक्रम असेल. सरकार आमच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही.’

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत, मात्र कृषी कायदे अद्यापपर्यंत रद्द केले गेले नाहीत. नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी मागील 60 दिवसांपासून शेतकरी कुडकुडत्या थंडीत धरणे प्रदर्शन करत आहेत.

शेतकऱ्यांनी आता पुढील कार्यक्रम संसदेवर पायी मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. हा कायदा संसदेत बनवण्यात आला आहे, तर तिथेच जाऊन प्रदर्शन करणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष 2020-21 साठीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या