लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा तडफडून मृत्यू

लाँग मार्चमधील पुंडलिक जाधव या 55 वर्षीय शेतकऱयाचा तडफडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सरकारदरबारी मागण्या ठोसपणे मंजूर न झाल्याने शेतकऱयांच्या लाल वादळाचा पडाव वासिंद येथे पडला आहे. उन्हातान्हात मैलोन्मैल चालत आलेल्या पुंडलिक यांना रात्री अचानक उलटय़ांचा त्रास व अस्वस्थ वाटू लागले. त्यांना शहापूर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र ते वाचू शकले नाहीत.