महापौर ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने ‘कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास मित्रसेन यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांचा मंगळवारी महापौर निवासात सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या काळात हिरिरीने सहभाग घेतला. मुंबईतील विविध कोरोना सेंटर्स, जम्बो सेंटर्स, पालिकेतील कोरोनाचे वॉर्ड येथे प्रत्यक्ष पीपीई किट घालून जातीने आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. मुंबईचे खंबीर नेतृत्व करत मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम केले. आरोग्य यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या.  त्यांच्या या कामाची दखल घेत इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सने त्यांना  सन्मानित केले.

आपली प्रतिक्रिया द्या