किशोरी पेडणेकर व सुहास वाडकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

1211
मुंबई- किशोरी पेडणेकर (शिवसेना)

मुंबईच्या महापौर पदासाठी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर पदासाठी ऍड. सुहास वाडकर यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. यानंतर या दोघांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे ऍड. सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे. भाजपने महापौर पद निवडणुकीतून माघार घेतली, तर विरोधी पक्षांकडून अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे त्यामुळे महापौर पदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर पदी शिवसेनेचे ऍड. सुहास वाडकर यांची निवड बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मुंबईचा महापौर शिवसेनेचाच! किशोरी पेडणेकर यांनी भरला अर्ज

राज्यातील 27 महानगरपालिकांमधील महापौरपदाची पहिल्या अडीच वर्षांची मुदत 21 नोव्हेंबरला संपत असल्याने बुधवारी मंत्रालयातून आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी सलग दुसऱ्या वेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले. त्यामुळे पालिकेच्या सर्व 222 नगरसेवकांना महापौरपदासाठी अर्ज करण्याची संधी होती. परंतु शिवसेनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाने अर्ज दाखल न केल्याने आता 22 नोव्हेंबरला होणाऱ्या या दोघांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या