आफ्रिकेत सापडला सोन्याचा डोंगर- सोने लुटण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी

आफ्रिका खंडातील कांगो देशातील दक्षिण किवू प्रांतातील एका गावात सोन्याचा डोंगर आढळला. या डोंगराची माहिती परिसरात पसरताच मोठय़ा संख्येने लोकांची गर्दी या डोंगराजवळ जमली. डोंगर पह्डून सोने घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. त्यानंतर सरकारने हा डोंगर पह्डण्यास बंदी घातली.लुहिही गावामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मुबलक सोन्याचा साठा सापडला. त्यानंतर या भागात लोकांची गर्दी झाली. मोठय़ा संख्येने खोदकाम करणारे दाखल झाल्यामुळे या लहान गावात संकट निर्माण झाले होते. वाढत्या गर्दीला दूर करण्यासाठी आणि खोदकाम थांबवण्यासाठी कांगो सरकारला लष्कर, पोलिसांना पाठवावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या