के. के. वेणुगोपाल नवे ऍटर्नी जनरल

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या हिंदुस्थानच्या ऍटर्नी जनरलपदी आज सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि घटनातज्ञ के. के. वेणूगोपाल यांची नेमणूक झाली आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज त्यांच्या नेमणुकीला मंजुरी दिल्याने येत्या एक-दोन दिवसांत सरकार त्यासंबंधी आदेश जारी करणार आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळय़ात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाची बाजू मांडली आहे.