कोहिनूर कॉन्टिनेन्टलमध्ये रंगतोय पॅन एशियन फूड फेस्टिव्हल

3772

अंधेरी येथील कोहिनूर कॉन्टिनेन्टलच्या ‘द सॉलिटेअर रेस्टॉरंट’मध्ये ‘पॅन एशियन फूड फेस्टिव्हल’ सुरू झाला आहे. या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ जाजो यांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या क्युझिन्सचा आस्वाद घेता येणार आहे. 25 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलला खवय्यांची चांगली पसंती मिळत असून हा फेस्टिव्हल 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

शेफ जाजो या प्रसिद्ध पॅन एशियन क्युझिन शेफ असून त्या गेली दहा वर्ष जपानी रेस्टॉरंटमध्ये काम करत आहेत. या फेस्टिव्हलमध्ये जपानी सुशी, मोमोज, चायनिज, थाय करीज असे लज्जतदार पदार्थ चाखायला मिळणार आहेत. एकाच छताखाली पॅन आशियातील अनेक पदार्थांची चव घेण्याची ही नामी संधी आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या