चाखा कश्मीरची चव, कोहिनूरमध्ये रंगणार दावत-ए- कश्मीरी

612

जम्मू कश्मीर हे देशाचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कश्मीरमध्ये पर्यटकांच्या जीभेचे चोचले पण चांगलेच पुरवले जातात. तिथल्या याखनी पुलाव, मटन याखनी, दम आलू, शीग कबाब अशा पदार्थांची नावं जरी ऐकली तर तोंडाला पाणी सुटतं. आता कश्मीरमधल्या पदार्थांची ऑथेंटिक चव आपल्याला मुंबईतल्या मुंबईत घेता येणार आहे.

अंधेरीतील कोहिनूर कॉन्टिनेन्टलमध्ये कश्मीरी फूड फेस्टिव्हल भरविण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार असून या फेस्टिव्हलला त्यांनी दावत-ए- कश्मीरी असे नाव दिले आहे. या दावतमध्ये आपल्याला शेफ झहूर वाणी, शेफ सुहेल अहमद, शेफ गुलाम नबी, शेफ अब्दुल माजीद यांनी तयार केलेल्या चमचमीत कश्मीरी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यात चमन किल्या, दम आलू, नाद्रू याखनी, नाद्रू पालक, गुबाई याखनी, दाल याखनी, बुमचुंद कुर्मा, मटन याखनी पुलाव , रोगन जोश, कश्मीर झाफरानी पुलाव, फिरनी, कश्मीरी हलवा अशा पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या