खरा वारसदार !

सामना ऑनलाईन,मुंबई

रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा दमदार शो पाहायला मिळाला. त्याने २०० व्या वन डे लढतीत खणखणीत शतक झळकावताना रिकी पाँटिंगच्या ३० वन डे शतकांना लीलया मागे टाकले. ३१ व्या शतकाला गवसणी घालणारा विराट कोहली आता फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावणारा विराट कोहली सचिन तेंडुलकर व मोहम्मद अझरुद्दीननंतरचा तिसराच हिंदुस्थानी खेळाडू ठरलाय. शिवाय २००व्या लढतीत शतक साजरे करणारा तो ए बी डिव्हीलीयर्सनंतरचा दुसराच फलंदाज. दरम्यान, न्यूझीलंडने हिंदुस्थानला पराभूत करीत वन डे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.