विंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली?

75
virat-kohli-3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान न्यूझीलंड संघाकडून झालेल्या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीची झोप उडाली आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी 23 जून रोजी दिलेला सुट्टीचा अर्ज टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने मागे घेतला आणि चर्चांना आणखी उधाण आले.

न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली या जोडीवर हल्लाबोल सुरू झाला. एका बाजूने CoA प्रशासकीय समितीने प्रश्नांची सरबत्ती लावली तर दुसऱ्या बाजूला चाहते देखील नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच विराट सुट्टीवर गेला असता तर टीकाकारांना आणखी संधी मिळाली असती. त्यामुळे विचाराअंती विराटने हा निर्णय घेतला असावा, असे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे.

वेस्ट इंडिज दौरा महत्वाचा

वर्ल्ड कप जिंकता न आल्याने विराटच्या आशांवर पाणी फिरले. अशातच विंडीजचा दौरा सोडला तर भविष्याच्या दृष्टीने मोठी संधी गमवण्याची शक्यता होती. विराटला या दौऱ्यात दमदार खेळ करत आपली योग्यता सिद्ध करून दाखवावी लागेल. तसेच स्वत:च्या चांगल्या खेळासोबतच टीम इंडियाला देखील मोठा विजय मिळवून द्यावा लागेल.

कर्णधार पदासाठी भक्कम दावेदार रोहित शर्मा

विराटच्या हातून कर्णधार पदाची धुरा कधीही रोहित शर्माच्या हाती जाण्याची शक्यता आहे. विंडीज दौऱ्याआधी तशी मागणी देखील केली जात होती. मात्र नशिबानं साथ दिली आणि विराटला संधी मिळाली. पण रोहित तयार आहे. कारण जेव्हा जेव्हा संधी मिळाली रोहित शर्माने चांगली कामगिरी करून दाखवली. रोहितच्या नेतृत्वात 10 पैकी 8 वन डे सामने तर टी-20चे 15 पैकी 12 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. त्यामुळे विराटने हा धोका न पत्करता सुट्टी रद्द करून विंडीज दौऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या