लवकरच ‘आयपीएल’ खेळणार! कोहलीकडून चाहत्यांना खूशखबर

14

नवी दिल्ली :

‘टीम इंडिया’ आणि बंगळुरू रॉयल चॅलेजर्स (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट लवकरच ‘आयपीएल’च्या मेगा टी-२० इव्हेंटमध्ये खेळणार आहे. त्याने स्वतः ट्विटरवर चाहत्यांना ही खूशखबर दिली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने कोहली चौथ्या कसोटीस मुकला होता.  याचबरोबर त्याच्या ‘आयपीएल’मध्ये खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती, मात्र विराटने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून आपण लवकरच मैदानावर परतणार असल्याचे वचन चाहत्यांना दिले. या व्हिडीओमध्ये एक कुत्राही कोहलीच्या सोबत दिसत आहे. त्याने आपल्या संदेशात म्हटले की, सध्या मी मैदानावर परतण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या कठीण प्रसंगातही तुम्ही साथ दिल्याबद्दल मी चाहत्यांचा आभारी आहे. ‘आयपीएल’मध्ये ‘आरसीबी’ला सपोर्ट करत राहा. मी लवकरच मैदानावर परतणार आहे, असे कोहलीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या