पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा केला विनयभंग, आरोपीला ३ वर्षाचा कारावास

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी तुषार मोहन चव्हाण (24) याला दोषी धरून विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यानी त्याला 3 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दण्डाची रक्कम पीड़ित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

पाचवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी सकाळी 9.15 च्या सुमारास खासगी शिकवणी वर्गासाठी जात होती. यावेळी वाटेतच तुषार याने जबरदस्ती ने तिचा हात धरला व तिला सलून मध्ये घेऊन गेला. तेथील खुर्चीवर बसवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे अश्लील वर्तन केले. 9 फेब्रुवारी 2018 रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार कणकवली पोलिसात दिली होती. त्यानुसार आरोपी तुषार याच्यावर भा. द. वि. कलम 354, 354ज्ञ(ब) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीच्या न्यायालयीन प्रक्रिये नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान, ओरोस येथील विशेष न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीड़ित मुलगी, तिची आई आणि शिक्षिका यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी पुराव्या नुसार आरोपीला दोषी धरून न्यायालयाने भा.द.वि. कलम 354 नुसार 3 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 1 महीना जादा साधी कैद.पोक्सो 8 नुसार 3 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महीना जादा साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या