शास्त्रीय संगीत महोत्सवाने रसिकांना दिली सुरांची मेजवानी

412

ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सवाची सांगता रविवारी रात्री झाली. तब्बल 16 तास चाललेल्या या संगीत मैफीलीत दिवसभराच्या प्रहरांनुसार राग प्रस्तुती करण्यात आली. देशभरातील 22 कलाकार यात सहभागी झाले होते. उपस्थित रसिकवर्ग त्यांच्या गायनाने मंत्रमुग्ध झाले. एकंदरीतच हा पहिला वाहिला शास्त्रीय महोत्सव रसिकांसाठी सुरांची मेजवानी देणारा ठरला.

कोकणात प्रथमच कुडाळ येथील हाॅटेल लेमनग्रासच्या सभागृहात रविवारी हा महोत्सव घेण्यात आला. मिती एंटरटेनमेंटच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 ते रात्री 12 वा. अशा तब्बल सोळा तास रंगलेल्या या संगीत मैफीलीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडिता शुभदा पराडकर यांच्या शिष्या औरंगाबादच्या अदिती कोरटकर आणि सावनी गोगटे यांच्या सहगायनाने मैफिलीलिचा श्रीगणेशा झाला. दोन्ही गायिकांनी मैफिलीत गायची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

आपली प्रतिक्रिया द्या