कोल्हापूरच्या कला नगरीची ओळख असलेल्या ऐतिहासिक कला आणि क्रीडा परंपरेच्या वारसा स्थळातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल गुरुवारी रात्री आगीत भस्मसात झालं. सोबत खासबाग मैदानातील कुस्तीचे व्यासपीठ आगीत भक्षस्थानी पडलं. कला क्रीडेला राजाश्रय देणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी साकारलेल्या या दोन्ही ऐतिहासिक वास्तू अग्नी तांडवात भस्मसात झाल्याने, सर्वच जण हळहळले. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग लागल्यानंतर ड्रोन च्या माध्यमातून केलेले चित्रीकरण आता समोर आले आहे.
तर आज सकाळपासून कला आणि क्रीडा जगतात प्रसिद्ध असलेली ही वास्तू भस्मसात झालेले घर पाहून अनेक कलाकार आणि खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. आगीच्या भक्ष स्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे झालेले विदारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक वास्तूच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.