कोल्हापूरच्या महाराजा हॉटेलला दिलासा,मालमत्ता जप्तीच्या नोटिशीला हायकोर्टाची स्थगिती

376

कोल्हापूर अर्बन बँकेच्या थकीत कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या महाराजा हॉटेल मालकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने बजावलेल्या मालमत्ता जप्तीच्या नोटीसीला मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली. कोल्हापूर अर्बन बँकेकडून महाराजा हॉटेल चे मालक सुनील खोत यांनी कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने ’महाराजा हॉटेल’ची पूर्ण जागा जप्त करण्याची खोत यांना 20 फेब्रुवारी रोजी नोटीस धाडली. या नोटीस विरोधात खोत यांनी ऍड. संदिप कोरेगावे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.  त्यावेळी ऍड. कोरेगावे यांनी खोत यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 गाळ्यांच्या विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे  संपूर्ण हॉटेलच जप्त करण्याची आवश्यक नाही असा दावाही केला. याची दखल घेत खंडपीठाने बँकेच्या नोटीसीला स्थगिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या