कोल्हापूर-मुंबई वातानुकूलित शिवशाही बससेवा शनिवारपासून

57

सामना प्रतिनिधी, मुंबई

एसटी महामंडळ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वातानुकूलित शिवशाही बससेवेचा प्रारंभ करणार आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर यशस्वी ठरल्यानंतर आता कोल्हापूर ते मुंबई मार्गावर शिवशाही बस धावणार आहे. येत्या शनिवार, ३० सप्टेंबरपासून रात्री १० वाजता कोल्हापूर व मुंबई सेंट्रल येथून एकाचवेळी या बससेवेचा प्रारंभ होणार आहे.

सर्वसामान्यांना परवडेल अशी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी ‘शिवशाही’ बससेवा एसटी महामंडळाने सुरू केली आहे. आतापर्यंत ही सेवा मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर तसेच रत्नागिरी-कोल्हापूर व मुंबई-अलिबाग या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या कोल्हापूर-मुंबई या ‘शिवशाही’ बसचे तिकीट ६२० रुपये इतके ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या