राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले

230
राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिणी असणाऱ्या राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सातही दरवाजे उघडले आहेत. धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राधानगरी धरणाची पाणी साठवण क्षमता ८.४१ टीएमसी आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोगावती नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी चांगला पाऊस होत असल्याने ते तुडुंब भरलेले असते. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग सांडव्यावरून होण्याऐवजी स्वयंचलित सात दरवाजे बसवण्यात आले आहेत. एक दरवाजा पस्तीस टन वजनाचा असून पाण्याची पातळी वाढत चालल्यास ते आपोआप दरवाजे खुले होतात. पाण्याचा विसर्ग सुरू राहण्यासाठी बनवण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण दरवाजांमुळे राधानगरी धरण दुर्मिळ असेच आहे.

राधानगरी धरण –
> राधानगरीजवळ भोगावती नदीवर संस्थानकाळात उभारलेले धरण
> आठ टी.एम.सी. पाणी साठवण्याची क्षमता
> सात स्वयंचलित दरवाजे
> या धरणामुळे, भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा
> धरणक्षेत्रात जलविद्युत प्रकल्प
> धरणामुळे जिल्ह्याचा पश्‍चिम भाग झाला असून अनेक गावं ओलिताखाली आली

आपली प्रतिक्रिया द्या