कोलकात्याचे आव्हान कायम, दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी धुव्वा

ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी धुव्वा उडवत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आपले आव्हान कायम राखले.

नितीश राणा (81 धावा), सुनील नारायण (64 धावा) या जोडीने अवघ्या 56 चेंडूंत केलेली 115 धावांची धडाकेबाज भागीदारी… वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची प्रभावी कामगिरी… अन् फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने 20 धावांमध्ये टिपलेले पाच बळी… याच जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला लोळवले आणि सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या दणदणीत विजयासह कोलकाता नाइट रायडर्सचे 12 गुण झाले असून दिल्ली पॅपिटल्सला 14 गुणांवरच समाधान मानावे लागले आहे.

यंदाच्या मोसमातील सर्वेत्तम गोलंदाजी

कोलकाता नाइट रायडर्सकडून मिळालेल्या 195 धावांचा पाठलाग करणाऱया दिल्ली पॅपिटल्सला 9 बाद 135 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व लेगब्रेक गोलंदाज वरुण चक्रवर्ती या जोडगोळीच्या प्रभावी कामगिरीसमोर दिल्ली पॅपिटल्सच्या स्टार खेळाडूंचा निभाव लागला नाही.

पॅट कमिन्सने 17 धावांमध्ये तीन फलंदाज बाद केले. वरुण चक्रवर्तीने 20 धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आतापर्यंत या मोसमात एकाही गोलंदाजाने पाच फलंदाज बाद केलेले नाहीत. वरुण चक्रवर्तीची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. दिल्ली पॅपिटल्सकडून कर्णधार श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 47 धावा केल्या.

सणसणीत भागीदारी

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंपून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कोलकाता नाइट रायडर्सची आठव्या षटकात तीन बाद 42 धावा अशी अवस्था झाली होती. नितीश राणा व सुनील नारायण या जोडीने 56 चेंडूंत 115 धावांची सणसणीत भागीदारी करताना दिल्ली पॅपिटल्सच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली.

नितीश राणाने 53 चेंडूंत एक षटकार व 13 चौकारांसह 81 धावांची खेळी साकारली. संघात पुनरागमन करणाऱया सुनील नारायण याने 32 चेंडूंत चार षटकार व सहा चौकारांसह 64 धावा फटकावल्या. कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 194 धावा तडकावल्या. दिल्ली पॅपिटल्सकडून अॅनरीक नॉर्खिया, पॅगिसो रबाडा व मार्प स्टोयनीस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

मालवणी तडका (कोलकाता-दिल्ली लढत)

दिल्लीन फिल्डिंग घेतली… नरेन आणि राणामुळे कोलकाताची 194ची पारध… आणि मगे वरुण चक्रवर्तीन येकटय़ान लायलेली दिल्लीची पाच कलमा…
शनिवारी कोलकात्याच्या तुलनेत दिल्लीची बॉलिंगय धड नाय नि बॅटिंगय… बादल चौधरीच्या शब्दांत – ‘हैरातय नाय नि माश्यातय नाय…’
(टीप – लेखक मालवणी समालोचक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या