आयपीएल – कोलकाता संघात बदल, रसेलऐवजी कोलीन खेळणार

13
सामना ऑनलाई । राजकोट

आयपीएल सुरू होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्स संघानं अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या कोलिन डी इनग्रमची निवड केली आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल काही कारणास्तव आयपीएलच्या या मोसमात खेळू शकणार नाही.

कोलिन डी इनग्रम न्यूझीलंडकडून सहा कसोटी, नऊ एकदिवसीय आणि आठ टी-ट्वेंटी सामन्यात खेळला आहे. येत्या ५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दहाव्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सची पहिली लढत ७ एप्रिलला गुजरात लायन्सविरूद्ध आहे. राजकोटमध्ये हा सामना खेळला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या