कोलकात्यात गरिबांसाठी फूड एटीएम’

36

सामना ऑनलाईन। कोलकाता

घरात व हॉटेलात होणारी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी कोलकातामध्ये फूड एटीएम सुरु करण्यात आले आहे. तब्बल ३२० लिटरची क्षमता असलेल्या या एटीएम फ्रिजमध्ये उरलेले अन्न ठेवले जाते व गरिबांना ते दान केले जाते. सांझा रेस्टॉरंट समुहाचे सहमालक आसिफ अहमद यांनी ही फूड एटीएम योजना राबवली असून शहरात अनेक ठिकाणी असे फूड एटीएम सुरु केली आहेत. नागरिकांकडून या योजनेस भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने कोलकातामधील गरिबांच्या दोनवेळच्या अन्नाचा प्रश्न सुटला आहे.

food-atm

रोटरी, राऊंड टेबल, आणि जेआयटीओ या संस्थाचांही या योजनेत समावेश आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या बऱ्याच लोकांना अन्न वाया घालवण्याची सवय असते. यामुळे बरेच अन्न फेकले जाते. घरातही अन्न वाया जात असते. जर हे अन्न गरिबांना मिळाले तर त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटेल. याच विचारातून फूड एटीएम सुरू केल्याचे अहमद यांनी सांगितले आहे.

या फूड एटीएम फ्रिजमध्ये लोकांनी आपल्याकडचे उरलेसुरले जेवण डब्यात आणून ठेवायचे आहे. तसेच काही हॉटेल्स यात ताजे अन्नही जमा करणार आहेत. गरजूंना हे अन्न वाटण्यात येत आहे. या फ्रिज एटीएमवर एक बोर्ड लावण्यात आला आहे. यात हिंदुस्थानमध्ये वर्षभरात जेवढ्या अन्नाची नासाडी होते तेवढ्या अन्नात ईजिप्तमधली संपूर्ण जनता वर्षभर जेवण करु शकते; असे लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या