कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृणपणे केलेल्या हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाला शिव आरोग्य सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
कोलकाता येथे घडलेल्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच सेंट्रल मार्ड, बीएमसी मार्ड, आयएमएजेडीएन, एफओआरडीए या निवासी डॉक्टर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. सदरचे पाठिंबा पत्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शनाचे नेतृत्व करणाऱया लीलावतीच्या जेनिफर व गायकवाड इन्स्टिटय़ूटच्या डॉक्टर्स व नर्सेस यांना देण्यात आले. यावेळी आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, सचिव ज्योती भोसले, शेखर शिर्सेकर, नीलेश चव्हाण आदी उपस्थित होते.