कोंडगावच्या सूरज मधाळेची वावटळ शॉर्ट फिल्म आजपासून नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रदर्शित

साखरपा सारख्या लहानशा गावातील तरुण सूरज मधाळेची बहुचर्चित फिल्म आजपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिल्व्हर आय इंटरनॅशनल महोत्सव नॉर्थ अमेरिका येथे सुरू आहे. त्याचे लाईव्ह स्क्रिनिंग नॉर्थ अमेरिकेच्या चॅनल वर होणार आहे. ही फिल्म आजपासून ते 20 सप्टेंबर पर्यंत पाहता येणार आहे.

ही फिल्म आपल्या सर्व भारतीयांना सुद्धा पाहता येणार आहे. या साठी https://www.imdcsilverscreen.com/silvereye2020 या लिंकवर जाऊन ती पाहता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही फिल्म पहावी व आनंद घ्यावा असे आवाहन सूरजने केलेलं आहे.

ही फिल्म कशी पहावी ?

वरील संकेत स्थळावर जाऊन त्यात VAVTAAL फिल्म सिलेक्ट करावी व त्यामध्ये समविष्ट असणारी पुढील प्रक्रिया पार पाडावी.

सूरजने भारतीय चित्रपट आणि दूचित्रवाणी संस्था पुणे येथे दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले आहे.तसेच तो कॉम्प्युटर इंजिनीयर आहे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरपा येथेच झालेले आहे. सूरजने वावटळ विषयक सांगताना म्हटले की, नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात कशाप्रकारे सर्वसामान्य कामगाराची परिस्थिती कशी होते याचे चित्रण केलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या