दापोली जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागातील बहुतेक प्राथमिक शाळांसमोर प्रशस्त अशाप्रकारच्या मोकळया जागा उपलब्ध आहेत मात्र पाजपंढरी गावातील शाळे समोर प्रशस्त अशा मोकळया जागेचा अभाव आहे. असे असतानाही शाळेच्या आवारात काही जागा आहे तेथे वाहने पार्क केली जात असल्याने त्याचा नाहक त्रास हा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी त्रास होवू नये यासाठी पाजपंढरी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक या महत्वाच्या बाबीकडे लक्ष देतील का ? अशाप्रकारचा सवाल उपस्थित होत आहे.
दापोली तालूक्यातील पाजपंढरी हे गाव मच्छिमार कोळी समाजाची वस्ती असलेले जिल्हयातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्याही खुपच मोठी आहे. त्यामुळे येथे विद्यार्थी पटाची संख्याही अधिकच आहे. विद्यार्थ्यांचा पट अधिक असल्याने येथे पूर्वी शाळेचे वर्ग हे दोन सत्रात घेतले जात होते. अशा या रत्नागिरी जिल्हा परिषद संचलीत पाजपंढरी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अथवा क्रिडा विषयक कवायती करण्यासाठी तसे शाळेच्या ठिकाणी क्रींडागणच उपलब्ध नाही मात्र शाळेचे लहानसे आवार आहे या आवारातच चक्क वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धड हुंडताही येत नाही तसेच वर्गातून बाहेर पडताना किंवा शाळेत येता जाता पार्क करून ठेवलेल्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना बाहेर पडताना पार्क केलेल्या वाहनांचा मोठाच अडथळा होत आहे.