कोकणावर आणखी एक अन्याय, मत्स्य महाविद्यालय नागपूरला पळवण्याचा घाट

31

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

अथांग समुद्र किनारा लाभलेल्या कोकणामध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठ सुरू करा अशी मागणी गेल्या काही वर्षात सुरू आहे. कोकणवासियांच्या मागणीला सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावत मत्स्य विज्ञान विद्यापीठ सोडा कोकणात असलेले एकमेव मत्स्य महाविद्यालयही नागपूरच्या विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाला जोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेले हे रत्नागिरी-शिरगावचे मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडल्यास कोकणाच्या आस्मितेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी-नागपूर असा प्रासकीय ताणही कर्मचारी वर्गाला सहन करावा लागणार आहे. मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मागणीला केराची टोपली दाखवत कोकणातलंच मत्स्य महाविद्यालय पळवण्याचा घाट सरकारने घालत कोकणावर आणखी एक अन्याय केला आहे.

कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न मत्समहाविद्यालय १९८१ पासून रत्नागिरी-शिरगावमध्ये सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये केवळ तीनच मत्समहाविद्यालये आहेत. त्यापैकी एक नागपूर आणि दुसरे लातूरमध्ये आहे. नागपूर आणि लातूरची मत्स्य महाविद्यालये मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरला जोडलेली आहेत, तर शिरगावचे मत्स्य महाविद्यालय हे कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे.

कोकणाला अथांग समुद्र किनारा आणि त्यावर पिढ्यानपिढ्या चालणारी मच्छिमारी त्यामुळे कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ व्हावे ही मागणी २००० सालापासूनच जोर धरु लागली होती. मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी स्थानिक आमदार आणि शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केला. कोकणात समुद्र किनारा आहे आणि मासेमारी आहे. मग मत्स्य महाविद्यालय नागपूरला का? हा प्रश्न उपस्थित करुन हे मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोकणात सुरू झाले तर याठिकाणी असलेल्या मच्छिमार आणि मत्स्य महाविद्यालयात क्षिण घेणार या विद्यार्थ्यांना फायद्याचे होईल असे अपेक्षित होते. मात्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाला सरकारने केराची टोपली दाखवलीच शिवाय कोकणात असलेले मत्स्य महाविद्यालयही पळवण्याचा घाट घातला. येथील मत्स्य महाविद्यालय नागपूर येथील विज्ञान आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाी संलग्न असलेले हे मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडले तर कोकणच्या आस्ितेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

कुठे दापोली, कुठे नागपूर
येथील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न आहे. प्रासकीय कामकाजासाठी दापोलीमध्ये ये-जा करणे हे महाविद्यालयीन कर्मचाऱ्याला नेहमीच सोयीचे ठरले आहे. जर मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडले गेले तर प्रासकीय कामासाठी महाविद्यालयाच्या कंर्मचारीवर्गाला रत्नागिरी-नागपूर अशी वाऱ्या कराव्या लागतील. हा ताण कर्मचारी वर्गावर पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या