मुंबई-गोवा महामार्गावर जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाणी वाया

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे जलवाहिनी फुटली असून हजारो लीटर पाणी वाया गेले. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही जलवाहिनी फुटली.

बावनदीवरून जेएसडब्ल्यू कंपनीकडे पाणी घेऊन जाणारी ही जलवाहिनी आहे. जलवाहिनी फुटताच पाण्याचा मोठा फवारा उंच उडू लागला व आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू लागले. मुंबई-गोवा महामार्गावरच ही जलवाहीनी असल्याने महामार्गावर पाणीच पाणी साचले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या