रत्नागिरी: मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलीसांचा छापा

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथे गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली. याठिकाणी गावठी दारु तयार केली जात होती. पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकूण 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गावठी हातभट्टी चालवल्याप्रकरणी विशाल काशीनाथ भोवड, (वय 37, रा. मिरजोळे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभट्टीविरोधात पोलीस नाईक किशोर साळवी यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गावठी हातभट्टीची दारु, पत्र्याचे बॅरल, प्लॅस्टीकचे बॅरल, गुळ व नवसागरमिश्रीत रसायन आणि अन्य साहित्य असा एकूण 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.