कोकण रेल्वेचे सिद्धेश्वर तेलगु यांचे कोरोनाने निधन

1839

कोकण रेल्वेचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलगु यांचे पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम इस्पितळात कोरोनावर उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. 2018 मध्ये निवृत्त निवृत्तीनंतर डोंबिवली येथे आपल्या कुटुंबियांसह रहात होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी आणि पत्नी असा परिवार असून त्यांच्या तिन्ही मुलांचे विवाह झाले होते. अलिकडेच आयआरसीटीसीचे माजी जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पिपल यांचेही कोरोनाने निधन झाल्याने रेल्वे अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सिद्धेश्वर तेलगू 2006 मध्ये कोकण रेल्वेत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रूजू झाले होते. त्यानंतर चीफ पर्सोनल ऑफिसर, मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि चीफ मॅनेजर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अशी विविध पदे यशस्वीरित्या सांभाळून ते निवृत्त झाले होते. त्या आधी ते पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने 5 जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. त्यांना त्यांच्या सहकार्यानी त्यांच्या तब्यतेची चौकशी करण्यासाठी फोन केले असता त्यांनी आपण आता चांगले होत असून लवकरच डिस्चार्ज होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते आणि रविवारी अचानक तब्येत ढासळल्याने त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या