खेड बसस्थानकातील भिंत धोकादायक

344

एस.टी. बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच्या भिंतीच्या पायाशी दोन फुटापर्यंतचा भाग ढासळला आहे. मात्र  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

खेड  बसस्थानक नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने  गजबजलेले असते. या ठिकाणी रोज हजारो प्रवासी येत असतात. यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच्या भिंतीची डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

त्यातच स्थानकाच्या आवारात असणारी दुचाकी वाहनांची पार्किंग, दुर्गंधी या समस्यांनी प्रवासी त्रस्त आहेत. यात आता नवनव्या समस्यांची भर पडू लागली आहे.  काही महिन्यांपूर्वी तिकीट आरक्षण खिडकीजवळील स्लॅब कोसळून युवक जखमी झाला होता. या घटनेतून कुठलाही धडा न घेता प्रशासनाने त्याठिकाणी केवळ ताडपत्रीचा आधार देत मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बसस्थानकाच्या वाहतूक नियंत्रण कक्षासमोरी ढासळलेल्या भिंतीलगत छोटेसे दुकानदेखील असून याठिकाणी प्रवाशांची रेलचेल सुरू असते. यामुळे  भिंतीची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या