महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

27

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव येथे महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यात गेल्या ३ आठवड्यात ७ जणांनी आत्महत्या केली असून यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तिघांनी गळफास घेतला, तिघांनी रेल्वे खाली आत्महत्या केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

ताज्या घटनेमध्ये शहरातील बागुल वस्ती येथे भाड्याच्या खोलीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मनोज बाबासाहेब तुपे (२० रा. धांदलगाव ता. वैजापूर. जिल्हा संभाजीनंगर) याने रविवार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खोलीची कडी लावून पंख्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे .

मनोज तुपे हा संजीवणी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मुळचा संभाजीनंतर जिल्ह्यातील मनोज त्याच्या चार मित्रासह भाड्याने खोली घेऊन राहात होते. मनोजने नक्की आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या