कोपरगावकरांवर करवाढीचा बोजा नाही; 53.74 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प

427

श्रीमंत राघोबादादा पेशवे वाड्याचे मानचिन्ह भूषविणारी नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव नगरपालिकेचा 2020-2021 चा 53.74 लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने कोपरगावकरांसाठी ही समाधानाची बाब आहे.

नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे व सभागृहाला शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. 53.74 लाख शिलकीचा आणि 118.59 कोटी रुपयांचे उद्धिष्ट असलेले हे अंदाजपत्रक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अंदाजपत्रकात काही कोटींनी वाढ करण्यात आली आहे.1 एप्रिल 2020 अंदाजे शिल्लक 39 लाख 44 हजार 773 संकलित व इतर कर 10 कोटी 36 लाख 95 हजार नगरपरिषदेचा मालमत्ता व उपयोगिता सेवा एक कोटी 83 लाख 23 हजार पाचशे अनुदाने 2 कोटी 50 लाख उर्वरित बाबींपासून मिळणारे उत्पन्न 39 कोटी 56 लाख 45 हजार एकूण 43 कोटी 89 लाख 68 हजार 500 भांडवली जमा विकास योजना अनुदाने व कर्जे 74 कोटी 29 लाख 95 हजार एकूण उत्पन्न आरंभीच्या शिल्लकेसह 118 कोटी 59 लाख 8 हजार 273 खर्च बाजू – कर्मचारी वेतन खर्च सात कोटी 79 लाख 74 हजार 210 सेवानिवृत्त वेतनावरील खर्च चार कोटी 57 लाख 76 हजार 763 सार्वजनिक सुरक्षितता आरोग्य शिक्षण व संकिर्ण इत्यादी सर्व विभागांचा आवश्यक महसुली खर्च 11 कोटी 68 लाख 57 हजार पाचशे एकूण सर्वसाधारण खर्च 24 कोटी सहा लाख आठ हजार 473 भांडवली कामासाठी खर्च 93 कोटी 99 लाख 25 हजार एकूण खर्च 118 कोटी पाच लाख 33 हजार 473 खर्च असून उत्पन्नातून सदर खर्च वजा जाता 31 मार्च 2019 ची संभाव्य शिल्लक 53 लाख 74 हजार 799 गृहीत धरण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपनगराध्यक्ष योगेश बागुल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगरसेवक नगरसेविका व सर्व खातेप्रमुख कर्मचारी हजर होते.

आपली प्रतिक्रिया द्या