कोपरगावात कोरोनाचा दुसरा रुग्ण, 14 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण

647

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावामधील 14 वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोपरगावात हा कोरोनाचा दुसरा पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे. या मुलीवर कोपरगाव येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर उपचार सुरु करण्यात आले आहेत. सध्या प्रकृती स्थिर आहे.

ठाणे येथील दोन मुलींना ठाणे येथुन त्यांचे आजोबा धोत्रे येथे घेऊन आले होते. मुलींचे वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे तिघांना धोत्रे येथील शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. या दोन मुलींचे आणि कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेले 15 जण, असे सतरा जणांचे स्वॅब शनिवारी नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी डॉक्टर महिलेच्या संपर्कातील 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ठाणे येथील दोन मुलींपैकी एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आला आहे.

त्यामुळे 17 पैकी 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. धोत्रे येथील काही परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या