कोपरगाव  पालिकेत चौथ्यांदा विषय समितीवर सेना-भाजपची बिनविरोध सत्ता

672

कोपरगाव पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पालिका सभागृहात पार पडली.   याप्रसंगी सर्व समित्या बिनविरोध घोषित करण्यात आल्या. पालिकेच्या विषय समितीत्यांचा कालावधी एक वर्षांचा असतो. त्यामुळे मावळत्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन विषय समित्यांची निवडणूक पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे होते.  या वेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्य अधिकारी सुनील गोर्डे, सुनील जवाद सर्वच समित्यांच्या सदस्यांसाठी केवळ एक-एकच अर्ज दाखल झाल्यामुळे व विहीत मुदतीत कोणीही माघार न घेतल्यामुळे पीठासीन अधिकारी गोविंद शिंदे यांनी बिनविरोध निवड घोषित केली.

या वेळी  बांधकाम समितीच्या सभापतीपदी अरिफ करीम कुरेशी, सदस्य जनार्दन सुधाकर कदम, शिवाजी आनंदा खांडेकर, रवींद्र नामदेव पाठक, कैलास द्वारकानाथ जाधव, संदीप गोरक्षनाथ वर्पे,  सौ प्रतिभा सुनील शिलेदार यांची निवड झाली. स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी अनिल विनायक  आव्हाड, सदस्य हर्षा  दिनेश कांबळे, सौ दीपा वैभव गिरमे, जनार्दन सुधाकर कदम, विजय गोविंदराव वाजे, संदीप सावळेराम पगारे, माधवी राजेंद्र वाकचौरे यांची निवड झाली. तर पाणीपुरवठा समिती सभापतीपदी   स्वप्निल शिवाजी निखाडे , सदस्य विजय गोविंदराव वाजे, सुवर्णा विवेक सोनवणे, शिवाजी आनंदा खांडेकर, ऐश्वर्या संजय सातभाई, संदीप गोरक्षनाथ वर्पे, वर्षा हिरामण कहार यांची बिनविरोध निवड झाली.

आपली प्रतिक्रिया द्या