कोपरगावात कांदा कडाडला; अडीच हजारांचा पल्ला ओलांडला

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे.

कांद्याच्या दरात  झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल शंभर  रुपयांची वाढ झाली आहे. कोपरगाव बाजार समितीत सध्या ३ हजार ६०० क्विंटल इतकी आवक होत असून, कांद्या नंबर १-२३०० ते २५६० नंबर २  २००० रुपये ते २२५०, गोल्टी कांदा २००० रुपये ते २२००, खाद १४००ते १६०० रुपये  प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. कोपरगाव बाजार समितीत किमान १६०० रुपये, कमाल २५६० रुपये, तर सरासरी २००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.  कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे बाजार समितीत मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे पाच दिवस डाळींब कांदा व भुसार मालाचा लिलाव होत असलेल्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित  प्रतवारी करून कांदा आणावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश, राज्यस्थानातील कांद्याचा हंगाम लवकर गुंडाळला गेला.  आता  चाळीतील कांदा संपल्यात जमा आहे. अपुऱ्या पावसाने नवीन लाल कांद्याचे पीक अर्धाहून घटल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरात वधारणा झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत कोपरगाव बाजार समिती डाळिंब दीडशे कॅरेट आवक वाढली असून भावात २७ रुपये किलो ची घसरण झाली आहे. ९०९ कँरेट प्रतिकिलो ११२ रुपये, डाळिंब नंबर १ -१८०० ते २२५१ रुपये, डाळिंब नंबर २ -१००० ते १७५० रुपये, डाळिंब नंबर ३ -१००ते ९५० रुपये, असा दर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या