कोरिअन युट्युबर हाताला धरून ओढत नेण्याचा प्रयत्न, खार पोलिसांनी केली दोघांना अटक

व्हिडीओ रेकॉर्डींग करत असताना एका कोरिअन युट्युबरला हाताला धरून खेचत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही महिला व्हिडीओ चित्रीत करत असतानाच हा प्रकार घडला असल्याने या तरुणाचा चेहरा यात स्पष्टपणे दिसला आहे. माहिती देण्याच्या बहाण्याने या तरुणाने या युट्युबरच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिचे चुंबन घेण्याचाही प्रयत्न केल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. मुंबईतील खार भागातील ही घटना असून पोलिसांनी या प्रकरणाचा स्वत:हून तपास करण्यास सुरुवात केला. तपासाअंती पोलिसांनी मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सारी या दोघांना अटक केली आहे.

खार भागात व्हिडीओ चित्रीत करत असताना हे दोन मुसलमान तरूण या तरुणीच्या जवळ आले होते. या दोघांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. मदत करतोय असं भासवून यातल्या एका तरुणाने या कोरियन तरूणीच्या हाताला धरून ओढायला सुरुवात केली. त्याने तिला आपल्या स्कूटरवर बसण्यास सांगितलं होतं, ज्याला या तरुणीने नकार दिला होता. तिथून काढता पाय घेतल्यानंतर या तरुणीला मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सारी यांनी बाईकवरून येत पुन्हा गाठलं होतं. आमच्यासोबत बाईकवर बस असं या दोघांनी सांगितलं होतं, मात्र ही तरुणी नकारावर ठाम राहिली होती. ज्यामुळे मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सारी तिथून निघून गेले. सदर घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर अनेकांनी शेअर केला होता, ज्यामुळे पोलिसांनी सदर घटनेचा स्वत:हून तपास करण्यास सुरुवात केली होती.