गडचिरोली – कोसमी-किसनेली जंगलात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

फाईल फोटो

गडचिरोली जिल्ह्यातील केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी सायकांळी झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत 5 नक्षली ठार झाल्याची माहिती पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी-60 जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये 5 नक्षलवाद्यांना ( 2 पुरुष व 3 महिला) ठार करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या