पोलिसांना मिळणार त्यांच्या ‘स्पेशल’ दिवसांसाठी सुट्ट्या

19

सामना ऑनलाईन । कोझिकोडे

केरळमध्ये पहिल्यांदाच कोझिगाड जिल्ह्याच्या पोलिसांच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी एक प्रयोग करण्यात येणार आहे. कोझिगाड पोलिसांना त्यांच्या वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी विशेष सुट्टी देण्यात येणार आहे.

याबाबत नवी प्रणाली एका आठवड्यामध्ये सुरू करण्यात येणार असून पोलीस विभाग या आठवड्यात आपल्या कर्मचाऱ्याकडून माहिती एकत्र करणार आहे. जेणेकरून नवी प्रणाली राबवताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सततच्या कामांमुळे पोलिसांना त्यांच्या कोणत्याच सुट्ट्या घेता येत नाहीत. त्यामुळे ही योजनेची पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी मदत होईल, या उद्देशातून कोझिकोडे शहर पोलीस आयुक्त कलिराज .ए .महेशकुमार यांच्या संकल्पनेतून मांडली आहे.

काही दिवसांपूर्वीच केरळ पोलीस असोसिएशनने कोझिकोडे जिल्हा कमिटीने वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसासाठी विशेष सुट्ट्यांची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ही मागणी मान्य झाल्यानंतर या निर्णयाचे पोलिसांकडून स्वागत करण्यात आले आहे. पोलीस विभाग ही प्रणाली राज्य पातळीवर राबवण्यासठी योजना तयार करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या