नेपाळच्या सुप्रीम कोर्टाचा पंतप्रधान ओलींना झटका

नेपाळच्या सर्वेच्च न्यायालयाने सोमवारी हंगामी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना मोठा झटका दिला. नेपाळची संसद बरखास्त करण्याचा ओलींचा निर्णय न्यायालयाने असंवैधानिक ठरवत येत्या 13 दिवसांत संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा आदेश दिला.

पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीवरून 20 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रपती बिद्यादेव भंडारी यांनी नेपाळची संसद बरखास्त केली होती. त्यानंतर पंतप्रधान ओली यांनी विविध संस्थांवर मर्जीतील व्यक्तींच्या नियुत्त्या केल्या होत्या. त्यासुध्दा न्यायालयाने रद्द केल्या आहेत. या नियुत्त्या करण्यासाठी ओली यांनी काढलेला अध्यादेशही न्यायालयाने रद्दबातल ठरवला. कोणत्याही सरकारी संस्थेवर नियुक्तीसाठी अधिकृत बैठक होते. ती बैठक बोलवावी लागू नये म्हणून ओली यांनी हा अध्यादेश काढला होता.

आपली प्रतिक्रिया द्या