क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेस राज्य शासनाची मंजुरी

605

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून साताऱ्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी देऊन यासाठी आवश्यक असलेल्या 75 लाख 46 हजार 186 इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी / जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामुग्री ई-टेंडर ऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता दिली आहे.

सातारा जिल्ह्यात आरटी पीसीआर लॅब नसल्याने कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णांचे स्वॅब नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे ही कंटेन्मेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांचे लक्षणे दिसत असल्यास कोरोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी बघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. व मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात आरटी पीसीआर लॅबसाठी प्रस्ताव पाठविला होता.

आपली प्रतिक्रिया द्या