श्रीकांत यांची महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजी व नेतृत्वावर टीका

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान संपल्यात जमा आहे. त्यांच्या सुमार कामगिरीवर चोहोबाजूंनी टीकाही केली जात आहे. याप्रसंगी कृष्णमाच्चारी श्रीकांत या माजी क्रिकेटपटूने महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजी तसेच नेतृत्वावर टीका केली.

त्यांनी एका दैनिकासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले की, या संपूर्ण मोसमात महेंद्रसिंह धोनी फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतोय, कर्णधार म्हणून कोणत्या योजना अमलात आणतोय याकडेच लक्ष गेले. सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱया क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर तसेच कर्णधार म्हणून तो ओळखला जातो. त्यामुळे त्याच्याकडून बऱयाच अपेक्षा बाळगल्या गेल्या.

प्रत्यक्षात मैदानात त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. 2019 सालातील वर्ल्ड कप व आयपीएल यामध्ये तो क्रिकेटच खेळला नाही. हाच फरक महेंद्रसिंह धोनी व चेन्नई सुपरकिंग्ससाठी घातक ठरला. एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धा झाली असती तर चित्र कदाचीत वेगळे दिसले असते, असेही कृष्णमाच्चारी यांनी स्पष्टपणे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या