जागतिक मंदीचा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार! ‘आयएमएफ’च्या प्रमुखांचे स्पष्ट मत

490
kristalina georgieva india imf world economic outlook

आर्थिक मंदीचा सामना 90 टक्के जगाला करावा लागेल. उदयोन्मुख बाजारपेठ असलेल्या हिंदुस्थानात मंदीचे परिणाम ठळकपणे जाणवतील. मोठा फटका बसेल, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख (आयएमएफ) क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी मांडले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा दर 10 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहचेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

कैद्यांना नेताना हळूच दोन शॉट मारले, 2 हवालदार निलंबित

‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून क्रिस्टीलिना जॉर्जिवा यांनी याच महिन्यात पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जागतिक अर्थव्यवस्थेबाबत सविस्तर भाष्य केले. दरम्यान, जॉर्जिवा यांनी आपली भूमिका मांडण्यापूर्वी हिंदुस्थानात वाहन उद्योगासह अनेक क्षेत्रांमध्ये मंदीचे चटके बसत आहेत.

भिकारी महिलेने ‘एवढे’ पैसे काढले की बँक झाली रिकामी, वाचा सविस्तर…

 

काय म्हणाल्या आयएमएफ प्रमुख?

  • दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था प्रगतिपथावर होती. 75 टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरू होता.
  • 2019मध्ये अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. 90 टक्के जगाला या मंदीचा फटका बसेल.
  • पुढील आठवडय़ात ‘आयएमएफ’कडून 2019-20 बाबतच्या आर्थिक स्थितीविषयी अहवाल जाहीर होईल.
  • अमेरिका आणि जर्मनीत बेरोजगारीत ऐतिहासिक वाढ झाली आहे.
  • हिंदुस्थान, ब्राझीलसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम ठळकपणे दिसतील.
  • चीनच्या अर्थव्यवस्थेतही घसरण सुरू आहे.
  • अनेक देशांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची हीच वेळ आहे. व्यापारासंदर्भात देशांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.
आपली प्रतिक्रिया द्या