ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करा, नाहीतर जीव देईन!

30

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलीवूड कलाकारांवर वैयक्तिक टीका करणाऱया केआरकेने ट्विटरला आत्महत्येची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या केआरकेने ‘ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करा, नाहीतर जीव देईन’; असे धमकीचे पत्रच ट्विटरला पाठविले आहे. बॉलीवूडच्या प्रत्येक नव्या चित्रपटाला नाव ठेवणाऱया केआरकेने काही अभिनेत्यांवर वैयक्तिक टीकाही केली होती. अकाऊंट बंद झाल्याने सध्या तो चांगलाच वैतागला असून ट्विटरविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस त्याने पाठविली आहे. माझे ट्विटरवर ६० लाख फॉलोअर्स असून त्यासाठी गेल्या चार वर्षांत मला ५ लाख रुपये खर्च आला आहे. ट्विटरने हे पैसे मला परत करावे, अशी मागणी केआरकेने केले होती. पण याचा ट्विटरवर कोणताच परिणाम न झाल्याने अखेर केआरकेने जीव देण्याची धमकी ट्विटरला दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या