वरुण धवनने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अभिनेत्याने उडवली खिल्ली

2557

अभिनेता वरुण धवन याचा नुकताच स्ट्रीट डान्सर हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट चांगली कमाई करत असाल तरी त्याला समिक्षकांच्या व प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रीया आलेल्या नाहीत. त्यामुळे हा चित्रपट देखील फ्लॉ़पच समजला जात आहे. यावरून अभिनेता कमाल राशिद खान याने वरुण धवनची खिल्ली उडवली आहे. वरुण धवनचे गेले सहा चित्रपट फ्लॉप गेल्याचे सांगत त्याने फ्लॉप चित्रपटांचा षटकार ठोकलाय, अशी खिल्ली उडवली आहे.

वरुण धवनचा ढिशूम, दिलवाले, ऑक्टोबर, सुईधागा, कलंक, स्ट्रीट डान्सर असे सलग सहा चित्रपट फ्लॉप गेले आहेत. आज वरुण धवनला स्वत:चा खूप अभिमान वाटत असेल कारण मोठे मोठे असा कारनामा करू शकले नाहीत जो त्याने करून दाखवलाय’, अशा शब्दात केआरकेने त्याची खिल्ली उडवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या