श्रीकृष्ण आणि माउली जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

सामना प्रतिनिधी । आळंदी

आळंदी येथे श्रीकृष्ण आणि माउली जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींच्या दर्शनासह श्रावणी सोमवार निमित्त मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.

श्रीच्या जयंती दिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना पवमान अभिषेक पूजा, दुधारती, ११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदमंत्रजयघोषात अभिषेक करण्यात आला. झाली. गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण आणि माउली जन्मोत्सव कीर्तन सेवेचे मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवा आणि विना मंडपात गावकरी भजन झाले. मंदिरातील धार्मिक महत्त्व लक्षात घेत आळंदी देवस्थानने कार्यक्रम आणि माउली मंदिरात श्रींचे गाभार्या वरील शिखराला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर लक्षवेधी दिसत होता.